लेखक : डॉ. फजर्लुरहमान फरीदी
अनुवाद : प्रा. अब्दुर्रहमान शेख
मुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य दृष्टीकोनाचा अभाव आहे. मुस्लिम हे अशा स्थितीत वागण्याबद्दलचे मार्गदर्शन नीटपणे समजून घेण्यास उत्सुक दिसत नाही. परिणामत: फक्त मुस्लिम समाजाचीच हानी होत नाही तर इस्लामची प्रतिमा मलिन होते आणि प्रमुख हेतुला मोठी हानी पोहचते.
वैविध्यपूर्ण समाजातील आज्ञाधारक जीवन व्यवहार पार पाडणे सामान्य मुस्लिमांना अधिक जड जाते. मुस्लिम व्यक्तीला सतर्क राहावे लागते कारण त्याच्या प्रत्येक जीवन व्यवहाराने एक संदेश जातो. त्याने आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारात इस्लामी शिकवणींचा अवलंब केला तर तो इस्लामचे योग्य चित्र इतरांपुढे ठेवत जातो. नाहीतर त्याच्या द्वारे इस्लाम बद्दल एक चुकीचा संदेश इतरांना पोहचतो. ह्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.
ह्या विद्वत्ता पूर्ण ग्रंथाद्वारे सुशिक्षित मुस्लिम व्यक्तीला काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान होते आणि सर्वसामान्य मुस्लिमांसाठी सुध्दा ते उपयुक्त ठरते.
आयएमपीटी अ.क्र. 109 पृष्ठे - 80 मूल्य - 20 आवृत्ती - 1 (2004)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/mioryvqvbgnduxfxnyh5hws6gf1435yw
Post a Comment