May 2020

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार

आयएमपीटी अ.क्र. 52     पृष्ठे - 64      मूल्य - 12          आवृत्ती -  (2016)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bsg8cfjj6p8q55pdsdouy41hyuzlfup3

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी
भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. ५१     पृष्ठे - ४०      मूल्य - 15          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/dljf5pffxwov1ti0riyr0q1krdrrdke2


लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. 50     पृष्ठे - 48      मूल्य - 18          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xis0qtrww4moaplz6cbhdtrst1zerbspलेखक - मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली


आयएमपीटी अ.क्र. 197      पृष्ठे - 96    मूल्य - 35                आवृत्ती - 1 (December 2010)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nptj7aw5zbm3i5bp7pw7q6rxtlt43cpo


लेखक - शेख मुहम्मद कारकुन्नू

भाषांतर - एल. पुणेकर

माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की आपल्यामुळे जगातील आनंदाचा क्षण आपल्या या लोकांना मिळाला हा आपण केवढा मोठा त्याग केला. हे सर्व कशामुळे घडते तर आपण आपली नम्रता, दया, माणुसकी हे गुण हरवले आहेत, ज्या गुणामुळे जगण्यातला खरा आनंद मिळतो.
आजच्या आधुनिक भांडवलशाहीतून टाळता न आलेले हे अयोग्य बदल असून ते आमच्या संस्कृतीस हानिकारक आहेत. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमातून (टी.व्ही., इंटरनेट इ.) याचा झपाट्याने प्रसार होत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 193      पृष्ठे - 48    मूल्य - 22           आवृत्ती - 3 (January 2016)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ik1wsonnc58y1oo1q9ubv4c1b7oq3j3k

लेखक - स्वामी लक्ष्मी शंकाराचार्य

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली

खरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?
सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन  अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३ वर्षांपर्यंत त्यांनी जे काही केले, ते अगदी कुरआननुसारच केले.  दुसऱ्या शब्दांत  सांगायचे झाल्यास मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन कुरआनचेच अर्थात इस्लामचेच प्रात्यक्षिक अगर व्यावहारिक रूप आहे. म्हणून  कुरआन व इस्लामला जाणून घेण्याचा सर्वांत महत्त्वपूर्ण व सोपा मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे  आहे, मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र  आणि कुरआन वाचून आपण स्वत: निर्णय घेऊ शकता की ‘इस्लाम एक आतंक आहे की आदर्श!’

आयएमपीटी अ.क्र. 192      पृष्ठे - 84    मूल्य - 35          आवृत्ती - 4 (March 2015)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/c1md1yvj4u0kbyrescezeujdt8c661ct


लेखक - तालिबुल हाशमी

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली

जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म्हणजेच लहानपण, तारुण्य, विवाह, सासर, पती, परिवार, पूजा व भक्ती, संयम, स्वाभिमान, मुलांचे संगोपान व प्रशिक्षण, दान-धर्म, समाज सेवा, नातलगांचे अधिकार पूर्ण करणे वगैरे अनुकरणीय होय.
 फ़ातिमांचे (रजि.) जीवनचरित्र हे समस्त स्त्रियांच्या कल्याणासाठी जीवनमार्गातील पाऊलखुणाच होय. या पाऊलखुणांवर जीवनाची वाटचाल केल्यास निश्चितच जीवनाचे अंतिम लक्ष्य प्राप्त होईल. ऐहिक आणि पारलौकिक जीवनात नक्कीच यश प्राप्त होईल.

आयएमपीटी अ.क्र. 191      पृष्ठे - 88    मूल्य - 35         आवृत्ती - 1 (December 2010)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/2mq7f0u6zjlo23d1h6wgstbswy8uw6n9

- मुहम्मद फारूक खान

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली

ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा करण्यात आली आहे. मानव आणि सृष्टीचा निर्माता ईश्वराशी आशा आहे की तो वाचकवर्गास लाभ प्रदान करील, तसेच आम्ही ईश्वराचे अत्यंत आभारी आहोत की त्याने विशेष कृपा करून आम्हास हे सत्कार्य करण्याची सुबुद्धी आणि सामर्थ्य प्रदान केले.
   
आयएमपीटी अ.क्र. 190      पृष्ठे - 65    मूल्य - 22         आवृत्ती - 1 (December 2010)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/culr719h2pvvsmgpormz0emiqyn156ol

- मु. जैनुल आबिदीन मंसुरी

    या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.
    इस्लाम द्वेषाने पीडित होऊन इस्लामला आणि मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नांची तकीसिद्ध व ठोस पुराव्यांसहित उत्तरे देऊन देशातील सौहार्दाच्या वातावरणात विष कालवणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे.

आयएमपीटी अ.क्र. 189  -पृष्ठे - 12   मूल्य - 08          आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/96o9e4784t6skkjyrnobf95udr5pw1wn

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

    आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/nwjurk1evv1e3b9ndt82ejfhgyr3j8d1

- मुहम्मद अफजल अहमद
 
    अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवितो. तोच त्यांचा शासक आहे.
    या पुस्तिकेत इस्लाम धर्म, कलिमा (पवित्रवचन), कलिमा शहादत, एकेश्वरत्व व प्रेषित्वाची साक्ष इ. विषयावर वर्णन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 184    -पृष्ठे -16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/003g6zfneah7lhgvsk1e6e3acv6857hd

- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी
 
    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे - 20    मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/1nrt0yimvf3impxvylt75y1ok5s9obed

संकलन - बी. एस. कांबळे
   
    जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते.
    आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि `सत्यमेव जयते' या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होते. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनसमूह म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरांवाचे स्वप्न साकारेल.

आयएमपीटी अ.क्र. 178     -पृष्ठे - 40     मूल्य - 20                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/orntyzfmrpg64umsdrmbp3xcj9i6snx8

- प्रा. उमर हयात खान गौरी
   
    विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.
    पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर भयानक आहे. वधुपक्षाकडून वरपक्षाला एक भली मोठी रक्कम आगाऊ दिली जाते आणि ही मागणी वरपक्षाची असते. आज ह्या कुप्रथेमुळे अनेक मुलींचे लग्नाचे वय निघून गेले आहेत. याचे दु:खदायक वर्णन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 177      -पृष्ठे - 64    मूल्य - 30                आवृत्ती - 2 (2013)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/bvqooxtbo0cxgnhtftmokl9ye98vhmw2


- गुलाम रसुल देशमुख 

    विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीव घेण्या हुंडा व दहेजच्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेते मंडळी यांचे मोठे योगदान आहे.
    या पुस्तिकेत इस्लामी शरिअत, पैगंबर (स.) यांचा आदेश, अल्लाहचा आदेश या विषयीचा वर्णन केला आहे आणि या अत्याचाराला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न करून, इस्लाममध्ये नारीचे स्थान आणि पैगंबरांची शिकवण शेवटी दिली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 175  -पृष्ठे - 10       मूल्य -08    आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/r685ojgz5aql8rds1hzonkitkluwcl9u


- गुलाम रसूल देशमुख
 
    तलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला आहे.
    सध्या `तलाक' हा चर्चेचा व वादाचा विषय बनला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुस्लिमेतर तर सोडाच, स्वत: अनेक मुस्लिम तलाक म्हणजे काय? त्याचा उपयोग केव्हा, कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा या विषयी अनभिज्ञ आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 174   -पृष्ठे -16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/zv9qr59huikwafejeio5skzbuio7w7p0

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   
    या पुस्तिकेत मनुष्य समाज प्रिय आहे आणि समाजाचा आरंभ कुटुंबाने होतो, याविषयीची चर्चा प्रारंभी करून कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता विशद केली आहे. कुटुंब समाजाचा पाया आहे आणि कुटुंब पुरुष व स्त्रीच्या माध्यमाने अस्तित्वात येते.
    पुस्तिकेत कुटुंबाचे धर्मातील स्थान विशद करताना कुटुंबाची खरी निर्मिती पैगंबरांद्वारे होते. प्रेषितांनी कौटुंबिक जीवन व्यतीत केले आहे. हे स्पष्ट केले आहे. विवाहाचे वैधानिक महत्त्व, विवाहाची घोषणा, समाजाने विवाहकार्यास सहाय्य करावे, पति पत्नीचे अधिकार व त्यांचे उत्तरदायित्व, मतभेदांना दूर करण्याचे उपाय, कुटुंब ईशदेणगी आहे, इ. विषयांवर चर्चा आली आहे.
आयएमपीटीअ.क्र. 171    -पृष्ठे-16      मूल्य - 10            आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/l70ceclw393gssmyt0qeh80fwcqp51zg- मु. अजहरूद्दीन सिद्धिकी

    समाजातील प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर कृत्रिम विषमता आहे आणि ही समाज विकासात विषाचे काम करते. सत्याचा प्रसार आणि असत्याला प्रतिबंध घालणे या महान कार्यात पुरुषाबरोबर स्त्रीला सुद्धा इस्लाम समान दर्जात्मक कार्य करण्याची शिकवण देतो. समाज नव-निर्माण कार्यात पुरुषाबरोबर स्त्रियां कार्यरत आहेत. इस्लामने स्त्रियांना चार भींतीच्या आत कोंडून ठेवले नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत आणि समान अधिकार बहाल केले आहेत. या विषयीची चर्चा या पुस्तकात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 165       -पृष्ठे - 12   मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/9k5o900hacdmea5uz20evhfhfhsibvcm- सुलतान अहमद इस्लाही

    आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.
    आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तिच्या वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.

आयएमपीटी अ.क्र. 163  -पृष्ठे - 16      मूल्य - 07      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/yjlpftm96q3hcynqtrgagyvnt4xj4rgg- सय्यद हामिद अली

    या पुस्तकात नास्तिक व अनेकेश्वरवादीच्या विचार सरणीवर चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही विचार सरणी सृष्टीतील वस्तुंच्या सामर्थ्यांनी प्रभावित होऊन जन्मल्या आहेत. याउलट एकेश्वरत्वाची विचारसरणी मुळात सृष्टीतील प्रत्येक शक्तीचा इन्कार करण्यावर आधारित आहे. ज्ञानविज्ञान व पाश्चात्य इतिहास जाणकारांना चांगले माहित आहे की इस्लामचा एकेश्वरत्व आणि मुस्लिमांच्या ज्ञानविज्ञान व संशोधनामुळेच युरोप आज प्रगत आहे.
    एकेश्वरत्वाने कोणत्याही अजस्त्र वस्तूला देव मानले नाही आणि त्याची पूजा केली नाही ती भीती बाळगली नाही. उलट निर्भयपणे त्यावर संशोधन केले, अंधश्रद्धा नष्ट केल्या आणि विज्ञान व संशोधनात अभूतपूर्व कामगिरी केली. या उलट चित्र दुसरीकडे सापडते.

आयएमपीटी अ.क्र. 162     -पृष्ठे - 32    मूल्य - 18       आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/8e3uf39lokpfz484om9jb94eod4aiyoh


- डॉ. उमर छाप्रा

    या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल.
    या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे दुसऱ्या प्रकरणात व्याज निषिद्ध असण्याच्या मूळ कारणावर खुलासा आला आहे तर अंतिम प्रकरणात व्याज मुक्त बँकिंग व्यवस्थेच्या काही मूलभूत नियम सांगितले गेले आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 161    -पृष्ठे - 32      मूल्य - 18      आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3uytw1hux2klqash9s0uzyjt6ma747j7लेखक - सय्यद अबूल आला मौदूदी

भाषांतर - सय्यद ज़ाकीर अली


दिव्य कुरआनची शिकवण आहे की मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात 'उपासना' आहे. "मी' मानव' आणि 'जिन' यांना केवळ आपल्या उपासने करिताच निर्माण केले!"
ही 'उपासना म्हणजे नेमके काय?' तसेच 'इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे?' जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देशपूर्ण होणे शक्यच नाही.

आयएमपीटी अ.क्र. 160    पृष्ठे - 40    मूल्य -15      आवृत्ती - 1 (Dec. 2008)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/90g5vq47y3ucddhybovoet2u5dugnxmg

लेखक - वहिदुद्दिन खान

भाषांतर - सलीम ए. अज़ीज


जग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
सदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे

आयएमपीटी अ.क्र. 158    पृष्ठे - 40    मूल्य -16      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/xvic399wh5bszve8ummtrmdbhbtf7bo7लेखक - मौ. अमीन अहसान इस्लाही (रह.)

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली


अल्लाह आणि त्याचे गुणधर्म या बाबतीत पवित्र कुरआनने जे काही, ज्या पुराव्यांनिशी सादर केले आहे, त्यांची सूची खूप लांबलचक असली तरी य पुस्तकात संक्षिप्ततेचाच मार्ग अवलंबिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात आवश्यक असलेल्या बाबी नमूद केल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 157    -पृष्ठे - 80    मूल्य -20      आवृत्ती - 1 (March 2008)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqwnkicculakp75mtiq5d6rdji3ylmjo- सय्यद अबुल आला मौदूदी

    या ग्रंथात वाचकाला नीती शास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील नीतीमत्ते संबंधी एकमेव योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही. ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने स्वत:मध्ये नैतिकता निर्माण करावी. नैतिकते विषयीचे सर्व मूलभूत प्रश्न असा स्थितीत त्याच्यासाठी अनुत्तरित झाले आहेत.
    मानवी नैतिकता निर्मितीसाठी इस्लामने आम्हाला देऊ केलेले काही मुलाधार आहेत. कारण इस्लाम विशिष्ट जातीची संपत्ती नाही तर अखिल मानवजातीची सामुहिक संपत्ती आहे.

आयएमपीटी अ.क्र. 156    -पृष्ठे - 28    मूल्य -10      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/7ttdn2kfhotm6l1i1n4twnp89ypv5n1p

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   
    पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा स्वीकार करीत नाही.
    परलोकावरील ईमानचा आमच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि जीवनाच्या सर्वांगाणा ते व्यापून आहे. परलोक वरील ईमान अल्लाहवरील ईमान अधिक दृढ करते, याचे ज्ञान ही पुस्तिका वाचल्याने कळून येते.

आयएमपीटी अ.क्र. 155     -पृष्ठे - 24     मूल्य - 16                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/py7ez8j1hegc2icvzfg7lobk701ltq7b

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवन संदेश' जग प्रसिद्ध इस्लामी धर्म पंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानव पीढीला महान मार्गदर्शक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनादर्शाची नितांत आवश्यकता आहे.
    वाचकाने पूर्वग्रह दुषितपणा, संकुचितपणा व मानसिक गुलामी झुगारून पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जीवन संदेश समजण्यासाठी ही पुस्तिका लाभदायी आहे.
   
आयएमपीटी अ.क्र. 154      -पृष्ठे - 24    मूल्य - 16   आवृत्ती - 6 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/lzcqp08tgwu0s2rzj87rtnc1gtq13g5h

- मौ. जलालुद्दीम उमरी
   
    या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवन परिचय देवून स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले तर त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत आणि उपकारक आहेत.
    अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी स्वत:हून एक परिपूर्ण जीवन व्यवस्था निर्माण केली जेणेकरून मनुष्याने आपले जीवन सरळमार्गावर व्यतीत करावे. मनुष्याने अंधारात जीवनभर चाचपडत राहू नये व मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून अल्लाहने ही व्यवस्था केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 148    -पृष्ठे - 20      मूल्य - 12               आवृत्ती - 7 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/aivsxutt361zzed3u204qsjcyql1bzoa

- सय्यद उलालुद्दीन उमरी
 
    या पुस्तिकेत मानव सेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानव सेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वर सेवा असत्याचा खुलासा केला आहे.
    उपासनेची कमतरता मानव सेवेने भरून निघते, ह्या विषयीचे वर्णन झाले आहे. तसेच मानव सेवेच्या भिन्न पद्धती सांगितल्या गेल्या आणिमानव सेवेचा व्यापक उद्देश सांगितला गेला. इस्लाममध्ये मानवी सेवेत कोणताही भेदभाव नाही. हे स्पष्ट करून मानवी सेवेची काही पैलू सांगितले गेले आहेत.
   
आयएमपीटी अ.क्र. 147     -पृष्ठे - 32    मूल्य - 16       आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xj96vlmu6caxv4ty7jy5y6vwgqp3xlna

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   

    आजकाल स्त्रीचे अधिकार या विषयावर चोहोबाजूने प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर आधुनिक बुद्धिवाद्यांनी बराच गदारोळ माजविला आहे आणि आक्षेपांची बरसात केली आहे.
    या पुस्तकात प्रथमत: संक्षिप्तपणे `इस्लामने' स्त्रीला प्रदान केलेल्या अधिकारांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यानंतर याविषयी घेण्यात आलेल्या ठळक आक्षेपांचा समीक्षात्मक वेध घेण्यात आला. सुरवातीला स्त्री स्वातंत्र्याच्या पाश्चात्य विचारसरणीचा समाचार घेण्यात आला. हा एक छोटासा रक्षणात्मक प्रयत्न आहे.
आयएमपीटी अ.क्र. 146   -पृष्ठे- 192     मूल्य - 100            आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/jqazzqeot7xzksv45cntywwtrnvspnx2

- मु. यूसुफ इस्लाही
 
    या ग्रंथात नीतीमूल्यांचा संग्रह प्रत्येक वर्ग व वयोगटाच्या वाचकांसाठी लाभकारक आहे. इस्लामशी प्रेम राखणारे बंधु भगिनी या अमूल्य संस्कार व शिष्टाचारांना आणि मांगल्यपूर्ण प्रार्थनांना आचरणात आणून आपले जीवन सुशोभित करतील. किशोर वयातील मुलांना भली माणसं बनविण्याचा प्रयत्न करतील.
    या ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या नियम व शिष्टाचारांना सुयोग्य क्रमासह सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुरआन, प्रेषिताचरण आणि सदाचारी लोकांच्या स्मृतिंच्या प्रकाशात योग्य जीवनशैली शिकविणारा हा ग्रंथ आहे ज्यामुळे सुसंस्कारितांना या जगात आणि परलोकात सुद्धा सफलता प्राप्त होईल.

आयएमपीटी अ.क्र. 142     -पृष्ठे - 320    मूल्य - 160  आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ge8jj6q26tcr71peqj08a516u11eyvp5

- मौ. अबुल आला मौदूदी (रह.)
   
    या पुस्तिकेत सांगितले गेले की मुस्लिम समाजाचे अस्तित्व कल्याण व उपकाराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. हा समुह सदाचाराचा विस्तार व दुराचाराचा बिमोड करण्यासाठी आहे.
    आवश्यकता आहे की आम्ही मुस्लिमेतरांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून घ्यावी ज्यामुळे असा कोणताही प्रकार घडता कामा नये की ज्यामुळे इस्लामबद्दल चुकीची धारणा निर्माण होईल. या पुस्तिकेत या संदर्भातच चर्चा आली आहे.
 
आयएमपीटी अ.क्र. 141     -पृष्ठे - 16    मूल्य - 10               आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/gbkblnolpmd3o3dhxyflrzl8uxrni3bj

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत एक लेख आहे इ.स. 1962 साली हजच्या प्रसंगी इस्लामी जगताच्या विद्वतजनांसमोर वाचण्यात आला होता.
    यात इस्लाम आणि सामाजिक न्याय, सत्याच्या रूपात असत्य, सामाजिक न्याय फक्त इस्लाममध्येच आहे, न्याय हेच इस्लामचे उद्दीष्ट आहे, इस्लामी न्याय, सामाजिक सेवा, व्यिक्त स्वातंत्र्य, सामाजिक संस्था आणि त्यांची सत्ता, भांडवलशाही व समाजवादाच्या त्रुटी, समाजवाद हे सामुहिक अत्याचाराचे अंतिम टोक इ. विषयावर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 140   -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/oimmruwz0affdhqxrjlc6ugeaeq50hu6

लेखक - सय्यद ज़हुरूल हुसेन

भाषांतर - खान फ़हिम

दिव्य कुरआनात एकेश्वरवाद, प्रेषितवाद आणि पारलौकिक वादाच्या आस्थेला अत्यंत शक्तिशाली पद्धतीने आणि शैलीने प्रस्तुत केले गेले आहे. त्या तिन्ही संकल्पना ज्ञात इतिहासाच्या प्रत्येक युगात योग्य आणि अयोग्य स्वरुपात जगाच्या प्रत्येक देशात आणि जाती धर्मात उपलब्ध होते आणि आजसुद्धा उपलब्ध आहेत. दिव्य कुरआनच्या अवतरण काळात सुद्धा अरब समुदायांत ही निष्ठा उपलब्ध होती. दिव्य कुरआनने ह्यात संशोधन करुन त्यातील अनुचित मिश्रणाला दूर केले. कुरआनने एकेश्वरवाद, प्रेषितवाद आणि परलोकवाद ह्या संकल्पनेला स्पष्ट आणि शुद्ध स्वरुपात जगापुढे मांडले आहे. अशा प्रकारे दिव्य कुरआनने मानवी स्वभावाच्या आणि मानवी प्रकृतिची तहान भागविली आहे. स्पष्ट आहे की मानव स्वभावाला मनुष्याच्या निर्माणकर्त्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतो?

आयएमपीटी अ.क्र. 139    पृष्ठे - 72     मूल्य - 15        आवृत्ती - 1 (2007)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/jz89qh1yyfzyh4tqbjyzauey9tmoqno9

सटीप मराठी भाषांतर

मौलाना सय्यद आला मौदूदी
(यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून)

मराठी भाषांतर
अब्दुल जबार कुरैशी
कुतुबुद्दिन हुसैन मनियार
मुबारक हुसैन मनियार

प्रकाशक
इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/121wfi58l5lyemipfusrwjhzqjsursil

- डॉ. फजलुर्रहमान फरीदी

    या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहिक नैतिक संकट आहे.
    आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद प्रभावी ठरला आहे. समाज नवनिर्माणाशी संबंधित चळवळीची सफलता नैतिकतेवर अवलंबून असते, हे स्पष्ट केले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 138    -पृष्ठे - 12     मूल्य - 10        आवृत्ती -2 (2012)डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2lull7xe714o6894r7pa4hjfzkpkyg56

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पॉकेट साईझ पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले.
    मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. जेणेकरून संपत्तीची निर्मिती, उपयोग व वितरणाची संपूर्ण व्यवस्था त्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आत घालावी.

आयएमपीटी अ.क्र. 137    -पृष्ठे - 08    मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/154s221gdd46bja3fxx5klemhwumc8r0

लेखक - फ़ज़लुर्रहमान फ़रिदी

भाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेख


न्यायाचा शोध आणि न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे हे इतिहास काळापासून चालत आलेले आहेत. या पुस्तिकेत न्यायाच्या शोधकार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ही पुस्तिका उर्दू मासिक ’ज़िंदगी-ए-नव’ यातील संपादकीय लेखसंग्रह आहे

आयएमपीटी अ.क्र. 135       पृष्ठे - 48    मूल्य - 12          आवृत्ती - 1 (2007)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/crrwpd4oae6a06z9tp243djz5pj3zc4g

- प्रा. खुर्शीद अहमद
 
    इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. मानवी इतिहासात केवळ इस्लाम परिपूर्ण ज्ञानाच्या स्वरूपात अवतरला आहे आणि त्याच्या अवतरणानेच ज्ञानाचे क्रांतिकारक वातावरण सर्वत्र पसरलेले आहे.
    या पुस्तिकेत शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाबाबतच्या गैरसमजुतीचे निरसन, श्रद्धाहीन शिक्षणाचे दुष्परिणाम, इस्लामी शिक्षण पद्धत, शिक्षणाचा उद्देश, शिक्षणाचे ऐतिहासिक स्वरूप, प्रेषित कालीन शिक्षण व्यवस्था आणि प्रेषितानंतरचा काळ यांचे वर्णन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 134    -पृष्ठे - 20   मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2013)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/nvwoxzl182p0mi2g82s783ta087ns7o6

- सैय्यद अबुल आला मौदूदी

    वर्तमान काळात आर्थिक समस्यांना केंद्रिय स्थान प्राप्त आहे. त्यांचा इस्लामी उपाय या पुस्तकात संक्षिप्तपणे सांगण्यात आला आहे. उत्तर दायित्वाच्या प्रखर भावनेतून पैगंबर (स.) यांनी नैतिक नियम व कायदे दिले आहेत. ज्यात आर्थिक व्यवस्था एक महत्त्वाचा भाग आहे, हे सर्व पूर्णत: ईश आदेशांवर आधारित आहे.
    जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसे की तसे स्वीकारले नाही तर इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसही योग्य आत्म्याचे चालू शकणार नाही की तिचे काही उल्लेखनीय लाभ सुद्धा मिळणार नाही, हे सांगितले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 132    -पृष्ठे - 32    मूल्य - 16        आवृत्ती - 2 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/gncqlu4pf09x314k515q8pnptnp2x4w9

लेखक - मौलाना सरूद्दिन इस्लाही

भाषांतर - हुसेन चांद खान पठान

कायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्त्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिलक राह शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे समाजामध्ये रूपांतर होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामूहिक जीवनास शक्ती प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणाऱ्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदाविषयक संस्थांची स्थापना या समाजाची अपरिहार्यता आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 131       पृष्ठे - 104    मूल्य - 6          आवृत्ती - 1 (2007)

डाऊनलोड लिंक :   https://app.box.com/s/813vor04a3u8i41puit0m923gbvpibek

- अबुल आला मौदूदी
   
    या पॉकेट साईझ पुस्तकात इस्लाम हाच एकमेव व मार्ग मुक्ती व कल्याणाचा आहे, हे सांगितले गेले आहे. वास्तविकता ही आहे की या जगाच्या सफलते सह किंबहुना यापेक्षा अतिमहत्त्वाचे म्हणजे पारलौकिक जीवन साफल्यप्राप्तीसाठी आणि नरकाग्नीपासून वाचण्यासाठी या जगात सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.
    यासाठी म्हणजेच मनुष्यजीवनाचे कल्याण होण्यासाठी एकमेव मार्ग अल्लाहचा दीन इस्लामला जीवनातील दैनंदिन व्यवहारात पूर्णपणे आचरले जावे.

आयएमपीटी अ.क्र. 128   -पृष्ठे- 08      मूल्य - 06            आवृत्ती - 3 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/x7ynvbm6sa2o3e4buzapvpflcn35j7jj

- प्रेमचंद मुन्शी

    प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप' (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले नाहीत.
    आजही हिंदुसाठी मुस्लिम एक रहस्य आहे तसेच मुस्लिमांसाठी हिंदु एक रहस्य आहे. ते दोन्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेत नाहीत. ही चिंता या पुस्तकात वर्णन करण्यात आली आहे. संस्कृतीचे तीन प्रकार न्याय, समानता, विश्वबंधुत्व तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची आणखी काही वैशिष्ट्यें वर्णन केली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 127    -पृष्ठे - 08  मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/p9x27qwhzzkr7evsmku9s53o8tx2o4lz

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो.
    इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि संन्यास सत्यधर्माच्या विरुद्ध आहे आणि जगात त्यामुळे बिघाड आणि विकृती येते. इस्लामचे अनुयायी उपद्रवांना घाबरून वन आणि पर्वताकडे पळ काढीत नाही, उलट अल्लाहच्या मार्गात जिहाद करून त्यांचा मुकाबला करतात.

आयएमपीटी अ.क्र. 126   -पृष्ठे - 16   मूल्य - 08         आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/vl4d8z5tdyljfzglg9894duplfutzu14

- मतीन तारिक बागपती

    या पॉकेट साईझ पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आला आहे. या गोष्टींद्वारा मुलांना सुबोध होऊन विचार करण्यास प्रेरणा सुद्धा मिळते.
    या पुस्तिकेत अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप, सदाचाराचा बदला, स्वकर्म महाकर्म, सदाचारी कोळी, तीन भाऊ, बाबरचे मानवता प्रेम आणि काम चुकारपणा वाईट आहे इ. गोष्टी आल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 123     -पृष्ठे - 12      मूल्य - 10    आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqgn6lgzu8hqlsmlcym6kxc5glqqfyj0

- प्रा. खुर्शीद अहमद

    11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे प्रतीक होती.
    विश्वव्यापी भांडवलशाहीचे वैभवशाली प्रतिरूप म्हणजे वर्ल्डट्रेड सेंटर होते. याविषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे जेणेकरून वास्तवता वाचकाच्या समोर यावी आणि वाचकास निर्णया प्रत येण्यास मदत व्हावी.

आयएमपीटी अ.क्र. 121   -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/6yip84dic1668zm6n0arh12j9khp5ay4

- मतीन तारिक बागपती
 
    हे पॉकेट साईझ पुस्तक सुद्धा बाल साहित्याला वाहिलेले आहे. ह्यात लहान लहान गोष्टी आहेत त्या सर्व बोधप्रद आहेत. लहान मुलांचे ह्या गोष्टीतून मनोरंजन तर होतेच परंतु त्याच वेळी त्यांना नैतिक शिक्षण सुद्धा प्राप्त होते.
    ह्यात आंधळा न्याय, सिंह आणि मनुष्य, हिरणी बहिण, तिरळा घुबड, प्रयत्नाचे फळ, लोमडीचे धाडस इ. लहान बोधकथा आल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 117   -पृष्ठे - 24     मूल्य - 06        आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/kpxsj4kmhnn7sb1lx9o7c4qa5nmavd8u

- इनामुर्रहमान खान
 
    या पुस्तकात लेखक महोदयांच्या दोन भाषणांचा संग्रह आहे जी त्यांनी वेगवेगळया प्रसंगी मध्य प्रदेशात दिलेली आहेत. एक कोणाचा आदेश चालेल? आणि दुसरे अल्लाहकरिता ईमान राखणे आणि मुस्लिम होणे आहे.
    या ऐतिहासिक वळणावर आणि क्रिया प्रतिक्रियाच्या सार्वभौमिक चक्राने सत्य आवाहनासाठी मोठा वाव मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याच सोबत ही संधी सत्यनिष्ठ लोकांसाठी फार मोठी कसोटी बनली आहे, याचे स्पष्टीकरण आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 113    -पृष्ठे - 32      मूल्य - 18          आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/abspjoei0u6yjh5zeh2ji8wgnbemveck

 - डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी
   
    धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम धर्म!
    या पुस्तिकेत विविध धर्मात एकमत कोणत्या गोष्टीत आहे? आणि मतभेद आहेत तर कोणत्या बाबतीत? वर्णन आले आहे आणि सर्वधर्मसमभावाच्या दृष्टिकोनाची समीक्षा सादर केली आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीपूर्ण सहजीवनाची चर्चासुध्दा आहे.
आयएमपीटी अ.क्र. 112    -पृष्ठे - 24     मूल्य - 16                आवृत्ती - 3(2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xilu4318du0d8hskmew2ewi7iht5gqbd

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget